एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून २६ हजार ५०० रुपये काढून घेत वृद्ध व्यक्तीची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

नेवासे खुर्द येथील पुंडलिक जालिंदर लष्करे (३९ वर्षे) यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुकिंदपूर शाखेत बचत खाते आहे. पैसे काढण्यासाठी नेवासेफाटा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ते गेले.

पैसे निघण्यास अडचण येत होती. मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे सांगत भामट्याने हातचलाखीने पैसे काढून घेतले. राजमुद्रा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ संशयिताला ताब्यात घेताना त्याची व पोलिसांची झटापट झाली.

मेजर ज्ञानदेव बर्डे व ग्रामस्थांनी त्याला पकडले. या भामट्याचे नाव सनिदेवल विष्णू चव्हाण (वय २१, मुद्येश वडगाव, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे.

त्याच्याकडून महाराष्ट्र बँकेचे एक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची ८, महाराष्ट्र ग्रामीण बँकेची २, बंधन बँकेचे १, अॅक्सिस बँकेचे १ अशी ९ एटीएम कार्ड व पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24