अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत.
मारहाण, छेडछाड, विनयभंग अशा घननामुळे महिला अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नुकताच अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील येसगाव मध्ये 16 वर्षीय मुलीचे मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
या गुन्ह्यातील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलीप कदम, दीपक कदम, सचिन कदम अशी तिघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह गाव परिसरात राहते आहे. त्यांच्या घरा शेजारीच आरोपीचे दुकान आहे.
बुधवारी 2 डिसेंबर रोजी पीडित मुलगी घरासमोर असताना आरोपी आले आणि म्हणाले तुम्ही आमच्या दुकानावर येणाऱ्या लोकांना बोलावून आमच्या बद्दल काही पण सांगत आहे. तसेच याचवेळी आरोपींनी पीडितेला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव शिर्डी हे करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved