दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यातच दरोड्याचा एक प्रयत्न पोलिसांनी हणून पडला आहे.

कोपरगाव शहराजवळ असलेल्या नगर मनमाड राज्यमार्गावर कातकाडे पेट्रोल पंपासमोर रात्री बारा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे हे रात्री गस्तीवर होते. गस्त घालत असताना त्यांना एक संशियीत स्कॉर्पियो उभी आढळून आली.

त्यांनी त्यातील व्यक्तींची चौकशी केली. आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे रा. गोटुंबे आखाडा ता. राहुरी, सुरज लक्षमण वडमोरे वय २२ रा. आहेर वायगाव ता. बीड,

राहुल कुंडलिक बुधनव वय २२ रा. खामगाव, भारत चितळकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकी, स्कॉर्पियो गाडी, लोखंडी गज, दोन लोखंडी कोयते, तीन मोबाईल अशा वस्तू जप्त करण्यात आल्या.

संभाजी भीमराज शिंदे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, सहायक पोलीस उप निरीक्षक शैलेंद्र ससाणे हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24