दरोडेखोर बाप-लेकास पोलिसांकडून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे, या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सरसावले आहे. अशाच एका दरोडेखोर बापलेकास पोलिसांनी अटक केली आहे.

हि कारवाई श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पिसारे खांड शिवारात ८ डिसेंबर रोजी घरफोडीच्या घटनेत १ लाख ३० हजार रुपयाचे

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उदाशा लालश्या भोसले व अतुल उदाशा भोसले या पिता पुत्र दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.

या पिता पुत्र दरोडेखोरांच्या विरोधात तळेगाव दाभाडे, आळे फाटा, बेलवंडी, पारनेर. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेलेले आहे.

पिंपाळे खांड येथील इंगळे वस्तीवरील घरफोडी ही कोळगाव येथील पिता पुत्राने केली अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दरोडेखोर पिता पुत्रास पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी ३० हजार किमतीचे सोन्याचे दागिने व एक चाकू जप्त केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24