अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-सध्या नगर जिल्ह्यात अवैध धंदे चालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यामुळे अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
नुकतेच जामखेड पोलिसांनी तालुक्यातील खर्ड्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन सुमारे २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा भागात जुगार अड्डा सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर जामखेड पोलिसांच्या पथकाने खर्डा गावात १२ रोजी धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
या कारवाईत सुमारे २५ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जुगाऱ्यांची नावे जामखेड पोलिसांत गोरख बबन खोबरे, सुरज तेजसिंग भागडे,
प्रविण बबन राऊत ( सर्व राहणार खर्डा) पद्माकर पांडुरंग काळे (धनेगाव ), महाविर बबन तादगे ( रा दौंडाचीवाडी) बापु भास्कर पवार ( रा अंतरवली भूम) या सहा जणांविरोधात जुगार कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान अटक करण्यात आलेल्या या सहा जुगाऱ्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आले. दरम्यान जामखेड पोलिसांनी अवैध व्यवसायासह जुगार अड्ड्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.