अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
यामुळे पोलीस प्रशासनाने देखील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच कर्जत तालुक्यात पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे.
कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, अण्णासाहेब जाधव यांना कार्यालयीन कामकाज करीत असताना गुप्त बातमीदाराकडून गोपनिय बातमी मिळाली की नांदगाव गावाचे शिवारात एका ट्रकमधुन अवैधरित्या गौण खनिज वाळु भरुन नांदगावकडे येणार आहे.
माहिती मिळाल्याने जाधव यांनी तात्काळ कार्यालयीन स्टाफला कळवुन सदर गौणखनिज वाहतुक करणारे ट्रकवर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत त्यांना एक पिवळ्या रंगाचा मोठा ट्रक अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आला. अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून चालक व मालक यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गौणखनिज हे कोठून आणले आहे व कोणास विक्रीसाठी घेऊन जात आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक भाऊसाहेब यमगर हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved