अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरुच ठेवले आहे.
आता नुकतेच पोलिसांनी कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे कर्जत पोलिसांनी गुटखा तस्करांवर छापा टाकला आहे. यामध्ये तब्बल 88 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.23 डिसेंबर 2020 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांनी माहीजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकून सदर टपरीमधून 88 हजार 51 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
तसेच याप्रकरणी गुटखा विक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे ( वय 36 वर्ष,राहणार माहिजळगाव) यास रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्यात पोलीस अंमलदार सुनील खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हाचा तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे हे करत आहेत