अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने आक्रमक कारवाई करत साडे तेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सिद्धटेक शिवारातील भीमानदी पात्रात बोटींच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती कर्जतचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना मिळाली.
त्यांनी श्रीगोंदा व कर्जत येथील पोलीस पथक घेऊन भीमा नदीपात्रात कारवाई करण्याची मोहीम राबविली. पोलीस पथकाने भीमा नदीपात्रात उतरवून अवैध वाळू उपसा यांत्रिक बोटी जप्त केल्या आहेत.
यामध्ये एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पो.ना. अप्पासाहेब कोळेकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सोमनाथ दिवटे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved