अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- शहरातील प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणाची हमी घेणार्या व कोरोनाच्या संकटकाळात सेवा देणार्या पोलीस दलातील जवानांना व महिलांना रक्षा बंधनाच्या दिवशी गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या.
पोलीसांनी रक्षा बंधनाच्या दिवशी महिलांच्या संरक्षणाची हमी दिली. तर कुटुंबापासून दूर कोरोनाच्या संकटात पोलीस प्रशासन देत असलेल्या सेवेबद्दल प्रतिष्ठाणच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रक्षा बंधनाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधिक्षक नगर शहर संदीप मिटके,
प्रतिष्ठाणचे हरजीतसिंह वधवा, किशोर मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मनिषा नहार व प्रांजल मुनोत यांनी पोलीसांना राख्या बांधल्या.
पोलीसांनी प्रत्येक महिलेची संरक्षणाची जबाबदारी स्विकारुन आपल्या बहिणींना अनोखी ओवाळणीची भेट दिली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी या कार्यक्रमास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, राजा नारंग, टोनी कुकरेजा, कैलाश नवलानी, संदेश रपारिया, प्रमोद पंतम, सुनील मुळे, विजय मनी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com