पोलिसांचा वाळूतस्करांना दणका २२ ब्रास वाळूच्या साठ्यासह साडेचार लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  अवैधवणे वाळू उपसा करून स्वत:च्या फायद्यासाठी वाळूसा साठा केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी धडक कारवाई करत २२ ब्रास वाळूचा साठा व ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी दोघंावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रात विना परवाना जेसीबी व ट्रक्टरच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करून

त्याचा साठा केल्याप्रकरणी पोलिसंानी राजू डोंगरे (रा.जांबुत ता.संगमनेर) सरेश सुदाम मोरे (रा.मोरवाडी ता.संगमनेर) या दोघांसी त्यांचे दोन साथिदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ९२ हजार ४०० रूपयांचा २२ ब्रास वाळूचा साठा,३ लाख ५५ हजारांचा लाल रंगाचा महिंद्रा ५७५ डीआय कंपनीचा ट्रॅक्टर, ट्रॉली व त्यावर एक वाळू चाळण्याची चाळणी असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शरदचंद्र गोरक्षनाथ नांगरे यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24