अहमदनगर बातम्या

पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लालपरी धावू लागली रस्त्यावर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची कोपरगाव- श्रीरामपूर ही एसटी बसला राहाता तालुक्यातुन पोलीस बंदोबस्तात श्रीरामपूरच्या दिशेने रवाना केली आहे.

लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले आहे. एसटी कर्मचारी आणि शासनाने हा संपाचा तिढा सोडवून सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी हुकमी असलेली सर्व बससेवा सुरळीत कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

जिल्ह्यात एसटी बाबत घडलेल्या काही गोष्टीं पाहता हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी 11.00 वाजता कोपरगाव आगारातुन बाहेर पडली.

कोपरगाव आगारात जवळपास 50 कर्मचारी कामावर हजर झाल्याने कोपरगाव आगाराने बस चालविण्याचा निर्ण्य घेतला. ही बस शिर्डी येथील आगारात आली.

दरम्यान राहाता पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने या गाडी सोबत राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दी दरम्यान आपल्या वाहनातुन सोबत प्रवास केला. प्रत्येक पोलीस ठाण्याने आपआपल्या हद्दीपर्यंत या बसला बंदोबस्त दिला. पोलीसांनी बंदोबस्तात ही गाडी श्रीरामपूरकडे रवाना केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office