अनाथ बालकांच्या घरी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांनी भेटी द्याव्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनाथ बालकांच्या घरी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांनी भेटी देऊन बालकनिहाय भेटीचा अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

तसेच बालकांचे शोषण होणार नाही व ते तस्करीसारख्या गंभीर गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी भोसले म्हणाले, पोलीस विभागाने करोना महामारीमुळे आई व वडील मृत पावलेल्या

जिल्ह्यातील सध्यस्थितीतील 24 बालकांना शासन निर्णयानुसार सर्वोतोपरी संरक्षण तसेच सदर बालके शोषणास बळी पडणार नाही याची सर्व संबधितांनी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आजघडीला जिल्ह्यात करोनामुळे एक हजार 223 बालकांची माहिती प्राप्त झालेली असल्याचे तसेच त्यापैकी दोन्ही पालक गमावलेली एकूण 24 बालके असून एक पालक गमावलेली एकूण एक हजार 199 बालकांची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना तात्पुरत्या स्वरूपात पिवळी शिधा पत्रिका वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत केली.