अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी वाहनांना बसवले रिफ्लेक्टर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात होतात. ट्रॅक्टरचालक वाहतूक नियमांबाबत अनभिज्ञ असतात. ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर बसवलेले नसतात, दिवे नसतात, काही ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात गाणी लावून वाहतूक करतात.

अशा या चालकांचे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामार्ग पोलिस व साजन शुगरने वाहनचालकांचे प्रबोधन केले. गाळप हंगाम सुरू झाल्याने महामार्ग, तसेच अन्य रस्त्यांवर ऊस वाहणारे ट्रक व ट्रॅक्टर दिसत आहेत. या चालकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, या उद्देशाने महामार्ग पोलिसांनी त्यांचे प्रबोधन केले.

श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साखर कारखाना परिसरात महामार्ग पोलिस व साजन शुगरच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी दिली.

वाहतूक नियम पाळले, तर संभाव्य अपघात रोखता येतील, वाहतूक काेंडी होणार नाही याची काळजी प्रत्येक वाहनचालकाने घेणे गरजेचे असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी सांगितले. यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24