दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे, या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सरसावले आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी मोठ्या धाडसाने गजाआड केले आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत केडगाव शिवारात कांदा मार्केट ते निल हॉटेल दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे.

पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे व पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि विवेक पवार व कर्मचार्‍यांनी दि.14 रोजी मध्यरात्री सापळा रचून आरोपींना पकडले.

एका दुचाकीवर तिघे तर दुसर्‍या दुचाकीवर दोघे आरोपी होते. पोलिसांनी एका दुचाकीवरील तिघांना पकडले तर दुसर्‍या दुचाकीवरील आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले आहे.

ताब्यात घेतलेल्या तिघांकडून एक एअर पिस्टल, विना क्रमांकाची दुचाकी, चाकू, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील आरोपी नितीन किसन पवार सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात कोतवाली, नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24