अहमदनगर बातम्या

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडला संशयित टेम्पो; आढळून आले लाखोंचे गोमांस

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीची गस्त घालत असताना एक संशयित टेम्पो पोलिसांनी पकडला. याटेम्पोमधील 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे जनावराचे मांस जप्त करण्यात आले.

गोमांस आणि महिंद्रा कंपनीची पिकअप असा सहा लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती शी कि, टेम्पो चालक किरण पांडुरंग कुंभार (राहणार शिंदेवाडी,

देशमुख वाडी, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) हा गोमास जातीचे मांस अवैधरित्या त्याच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा संशयित टेम्पो जाताना आढळून आल्याने पोलिसांनी पाठलाग करून

टेम्पो पकडला. नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी टेम्पो चालकाकडे अधिक विचारणा केली असता सदरचे गोमास नगर शहरामधील अरबाज गुलाम रसूल कुरेशी याच्या मालकीचे असल्याचे सांगितले.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात टेम्पो चालक व गोमास मालक यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office