शहरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांची धाड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सर्वत्र अवैध धंद्यांना जोर आला आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी अवैध धंदे वाढू लागले आहे.

या धंद्यांना लगाम बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. शहरातील पाईपलाईन रोड, सावेडी अहमदनगर येथील वाणीनगर कमानीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी चालु असलेल्या

कल्याण मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन पोलिसांनी रोख रक्कम ७ हजार ९७० रुपये तसेच सदर गुन्हयातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तसेच दुपारी भिस्तबाग चौक, सावेडी अहमदनगर येथील विश्वलदमी अपार्टमेंट, गायकवाड चिकन मागे भिंतीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी चालु असलेल्या

\कल्याण मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन ११हजार ७५० रु. रक्कम तसेच जुगार खेळणाऱ्याना ताब्यात घेण्यात आलेले आहे. वरील दोन्ही कारवाई बाबत तोफखाना पो.स्टे. येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24