अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांची वाढलेली तस्करी रोखण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे.
नुकतीच शहरातील तेलीखुंट येथील गोदामात लपवून ठेवलेला गुटखा पोलिसांनी छापा घालून जप्त केला आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने ही कारवाई आज सायंकाळी केली.
लाखो रुपयांच्या गुटख्याची रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिसांकडून मोजदाद सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, शहरातील तेलीखुंट येथील गोदामात गुटखा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली.
परंतु अधिक तपास केल्यावर येथे गुटख्याने भरलेले गोदाम आढळले. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला आहे. सुमारे तीन टेम्पो पेक्षा जास्त हा गुटखा आहे.
मोजदाद करायला वेळ लागेल, त्यानंतर गुन्हा दाखल होईल. या सर्व प्रक्रियेला मध्यरात्र होईल, असे तोफखाना पोलिसांकडून सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved