बाळ’ बोठेच्या शोधार्थ पोलिसांची छापेमारी परंतु…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या शोधासाठी बुधवारी तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले.

मात्र तेथे तो आढळून आला नाही. दरम्यान कोर्टाने रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात स्टँडींग वॉरंट जाारी केल्याने आता त्याच्या मागावर विविध पोलिस पथके रवाना केली आहेत.

अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली. जरे यांची हत्या होवून आता सव्वा महिना उलटला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे अद्यापही पसार असून

न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

मात्र पारनेर न्यायालयाने त्याच्या विरोधात स्टॅडींग वॉरंट पारीत केल्यने आता पोलिसांनी अनेक ठिकाणी एकाच वेळी त्याचा तपास सुरू केलेला आहे.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाला त्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह अन्य पथकाने त्या ठिकाणी छापेमारी केली परंतु बोठे आढळून आला नाही.

दरम्यान या घटनेचा पोलिसांनी आता वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला असून बोठे याच्या मालमत्ता कुठे कुठे आहेत, यासह त्याची कोणासोबत भागिदारी आहे का, याचा देखील तपास पोलीस घेत आहेत

अहमदनगर लाईव्ह 24