अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- चायना नायलॉन मांजा विक्रीस पायबंद असताना विक्री करताना आढळून आलेल्या दुकानांवर कोतवाली पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून नायलॉन मांजा जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
कन्हैय्या पतंग सेन्टर (झेंडीगेट), A 1 पतंग सेंटर (देशपांडे हॉस्पिटलजवळ), माउली पतंग (भूषणनगर केडगाव), ड पतंग केडगाव यांच्यावर छापा टाकून त्यांच्या दुकानातून एकुण 7 हजार 950 रु किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
तसेच श्रध्दा जनरल पतंग सेंटर (भोसले आखाडा), वाघमारे पतंग सेंटर (गुगळे कॉलेज शेजारी), कृष्णा आर्ट पतंग सेंटर (शिवाजी नगर कल्याण रोड),
लक्ष्मी कॉर्नर पतंग सेंटर (शनिचौक अ.नगर) यांच्यावर छापा टाकून दुकानातून एकूण 5 हजार 310 रु किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. दरम्यान या दुकान चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.