अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकत अवैध दारू जप्त केली आहे. यातील आनंद उर्फ छोट्या आहिरे हा आरोपी फरार झाला असून
मंगेश नारायण पवार व बाबासाहेब चंदन भोजने या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता शिर्डी पोलिसांनी छापा टाकत मंगेश नारायण पवार,
रा. पोहेगाव याच्याकडे 780 रुपये किंमतीच्या 15 नग देशी दारूच्या बॉबी संत्रा 180 मिलीच्या बाटल्या सापडल्या. आनंद उर्फ छोट्या आहिरे, रा. पोहेगाव याच्याकडे 884 रुपये किंमतीच्या 17 नग देशी संत्रा 180 मिलीच्या दारू बाटल्या
सापडल्या तर बाबासाहेब चंदन भोजने, रा. पोहेगाव याच्याकडे हातभट्टीची 20 लिटरची 2000 रुपये किंमतीची गावठी दारू सापडली.
अशी एकूण तीन प्रॉव्हिजन गुन्ह्याचा कारवाया करण्यात आल्या. सदर कार्यवाही पो. उपनिरीक्षक जाणे, पो. ना. मकासरे पो. ना. गोडे, पो. कॉ. राठोड यांनी सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved