अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यातील 11 ठिकाणी हातभट्टीवर छापे टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एकूण 11 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,
श्रीरामपूरच्या अपर अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या वेगवेगळ्या पथकाने 3 ते 5 ऑगस्ट या कालावधीत हातभट्ट्यांवर छापे टाकले.
या छाप्यात गावठी हातभट्टी तयार दारू, कच्चे रसायन, भट्टीची साधने असा तीन लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकूण 11 जणांविरोधात जिल्ह्यातील राहुरी, शिर्डी, कोपरगाव शहर, कर्जत,
जामखेड, नगर तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एलसीबीकडून हातभट्ट्यांवर सातत्याने केल्या जात असलेल्या कारवायांमुळे हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत.