अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- तोफखाना पोलिसांनी सोमवारी रात्री सिव्हील हाडको परिसरात एका ठिकाणी छापा टाकला असता तीन लाख 22 हजार रूपये किंमतीचा गुटखा पकडला. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी संतोष गोकुळ साळवे (वय 47 रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गिर्हे व केदार हे एमडीटी 112 चा टॅब घेऊन कर्तव्यावर असताना
त्यांना फोन आला की, सिव्हील हाडको कॉलनीत म्हाडा बिल्डींग शेजारी नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आहुजा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला आहे.
अशी माहिती मिळाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलीस पथकाने माहितीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता सदर ठिकाणी आरएमटी,
तंबाखू, विमल असा तीन लाख 22 हजार रूपये किंमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी सदरचा गुटखा जप्त केला असून संतोष साळवे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.