शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-कोपरगाव शहरात सुरु असलेल्या गोवंश जनावरांच्या कत्तल खान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला आहे.

या छाप्यात पोलिसांनी 16 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका केली. दरम्यान कोपरगाव शहराच्या मध्य वस्तीतील आयेशा कॉलनीत सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहर पोलिसांनी हि धडक कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी धाड टाकली.

या धाडीत 14 जर्शी गायी तर दोन गावरान गायी असा 16 गायी व त्यांची सुरु असलेली कत्तल त्यांचे गोमांस असा 2 लाख 36 हजार 500 रुपयांचा ऐवज मिळून आला.

पोलिसांनी संबंधित ठिकाणावरून आरोपी वसीम फारूक कुरेशी (वय 20), अक्रम फकीर कुरेशी (वय 27), खालील जमाल कुरेशी (वय 36) सर्व रा.आयेशा कॉलनी संजयनगर कोपरगाव आदींना रंगेहात जेरबंद केले आहे.

दरम्यान या सर्व आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24