अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-कर्जत ते राशिन रोडवर असलेल्या हॉटेल गणेश या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या ३ महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीसांमार्फत १ बनावट ग्राहक राजेंद्र दिपेंद्र ठाकुर यांचेकडे पाठवुन हॉटेल गणेश येथे वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत पंचासमक्ष खात्री करण्यात आली.
त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीसांनी हॉटेल गणेशवर छापा टाकला असता त्यांना हॉटेल गणेश चालविण्यासाठी घेतलेला राजेंद्र दिपेंद्रकुमार ठाकुर हा ३ मुलींकडून स्वत:चे आर्थिक फायदयासाठी वेश्या व्यवसाय करवुन घेताना मिळुन आला.
राजेंद्र दिपेंद्रकुमार ठाकुर यास वेश्या व्यवसाय करण्याकरीता केरला आण्णा हा मुली पुरवत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने राजेंद्र दिपेंद्रकुमार ठाकुर,
(रा.अक्काबाई नगर, भांडेवाडी, ता.कर्जत) व केरला आण्णा तसेच त्यांना मदत करणारा सोनु काळे (रा.राशिन जवळ, ता.कर्जत) याविरुध्द कर्जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.