अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- गुटखा व तंबाखू जन्य पदार्थांचीवाहतूक करणार्या वाहनाने एका मोटारसायकलला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर वाहनचालक फरार झाला.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला असून एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वडगावपान ते तळेगाव जाणार्या रोडवर वडगावपान फाट्यावर एका वाहनामधून बेकायदेशिररित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत होती.
दरम्यान या वाहनाने एका मोटारसायकलला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. 1 लाख रुपये किमतीची कार व गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असे एकूण 3 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलीस नाईक नितीन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अफरोज उर्फ आफ्रीदी रफिक पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए. के. दातीर करत आहेत.