अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- रेशनकार्डवर सर्वसामान्यांना दिला जाणारा तांदूळ बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा एक टेम्पो पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतला. मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेत टेम्पोचा चालक पसार झाला.
पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेवून पोलिस स्टेशनमध्ये आनला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक या ठिकाणी रेशनचा तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पारगाव सुद्रिक येथे रात्री उशिरा रस्त्याने संशयास्पद रितीने जाणारा आयशर टेम्पो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ थांबवले व पाहणी केली असता.
या टेम्पोमध्ये सुमारे ८० ते ८५ पांढऱ्या गोण्यामध्ये तांदूळ भरलेला दिसला. मात्र पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालकाने तेथून धूम ठोकली. चालक फरार झाल्याने पोलिसांनी तो टेम्पो पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणला.