‘त्या’ पीक-अप मधून पोलिसांनी पकडली पंधरा लाखांची दारु !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत विदेशी दारू जप्त केली. भाळवणीकडून कल्याण रोडने अहदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच 16, एई 1181) ही विदेशी दारुचे बॉक्स घेऊन येत आहे.

पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच 16, बीएच 1919) या गाडीतून दारू घेऊन जाणारा मालक आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना कळली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईअंतर्गत 15 लाख 44 हजार 820 रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. नरेंद्र राजेंद्रसिंग रौतेला (वय 40, रा.घर नं.204 प्रेमनगर, माजरा बायपास लहान, डेहराडून, उत्तराखंड) ,

चालक बबन भाऊसाहेब काकडे (वय 35, रा.गोरेगाव ता.पारनेर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार पथकाने नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी सापळा लावून मुद्देमालासह दारू वाहुन नेणार्‍या दोघांना पंचासमक्ष पकडण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना संदिप कर्डीले, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24