अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. प्रशासनाची भिती न बाळगणाऱ्या या मंडळींनी खुलेआम आपले अवैध धंदे सुरु केले आहे.
या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. नुकतीच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक येथे घारगाव पोलिसांनी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणार्यास दुचाकी व रोख रकमेसह पकडले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, संगमेनर तालुक्यातील घारगाव तालुक्यातील कोठे बुद्रुक गावातील साहेबराव काशिनाथ वाकळे हा टपरीच्या आडोशाला दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या
विना परवाना व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची विक्री होता. पोलिसांनी अत्यंत चालाखीने वाकळे यास देशी-विदेशी दारूसह, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 32 हजार 554 रुपयांचा मुद्देमालसह ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी साहेबराव वाकळे याच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved