अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंदे वाढू लागले आहे. यांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे.
नुकतेच कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कार्रवाईकेली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि,
आज मंगळवारी राशीन शहरात करमाळा रोड येथे ललिता शाम भोसले, रा राशीन, ता. कर्जत या घराचे आडोशाला गावठी दारू विक्री करत असल्याबाबत स.पो.नि सोमनाथ दिवटे यांना गोपनीय माहीती मिळाली.
सदर ठिकाणी स्टाफसह जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणाहून गावठी दारू व नवसागर असा एकुण रू 13 हजार 100 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व राशीन पोलीस दुरक्षेत्राचे सोमनाथ दिवटे,
सहा.पोलीस निरीक्षक व पोलीस स्टाफ तुळशीराम सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे,होमगार्ड बापु गदादे यांनी केली.