अहमदनगर बातम्या

कोपरगावात साठवण तलावाच्या जलपूजनावरून राजकारण तापले; दिलेला शब्द पूर्ण केल्याने आ. काळे यांचे पारडे जड

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कोपरगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या जलपूजनावरून सध्या या तालुक्यात चांगलेच राजकारण तापले आहे. हा तलाव आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच मार्गी लागला असल्याचे सांगत आमदार काळे यांचे म्हणणे असून, त्यामुळे या तलावाचे जलपूजन देखील आपणच करणार आहे. तर दुसरीकडे विरोधक मात्र हा तलाव आपल्याच पाठपुराव्यामुळे झाला असून, आमदारांचा याच्याशी काहीच संबंध नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या तलावाच्या जलपूजनावरून सध्या तालुक्यात चांगलेच राजकारण सुरु आहे.

दरम्यान शहराचा पाणी प्रश्न मागील काही दशकांपासून प्रलंबित होता त्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मला संधी द्या, मी कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवून दाखवतो. असा शब्द आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिला होता.

त्या शब्दावर कोपरगाव मतदार संघातील जनतेने व कोपरगावकरांनी विश्वास ठेवून आशुतोष काळे यांना सेवा करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करतांना निवडून आल्यानंतर दोनच महिन्यात आ.काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाई कामास प्रारंभ केला होता. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून १३१.२४ निधी आणून त्यांच्या अथक प्रयत्नातून हे काम पूर्णत्वास जात आहे.

हा कोपरगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लागत आहे. याचा विशेष फायदा महिला भगिनींना होणार असून मागील अनेक वर्षांपासूनची अडचण आ. काळे यांनी दूर करून दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

त्यामुळे कोपरगाव शहरातील महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण असून दिलेला शब्द पूर्ण करणारे व कोपरगावकरांना पाणी देणारे आ. आशुतोष काळे हेच पुन्हा आमदार होतील, असा दृढ विश्वास व्यक्त करून आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे.

त्यामुळे कोपरगाव शहरातील सर्वच महिला या जलपूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे कोपरगावच्या महिलांनी सांगितले आहे.

आजवर कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भल्या भल्यांना सोडविता आला नाही. निवडणूक आली की, पाणी प्रश्नावर गळे काढायचे आणि वेळ मारून न्यायची हे कोपरगावकरांनी अनुभवले आहे.

परंतु आ. आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून त्यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण करून देखील दाखविला आहे. त्यामुळे कोपरगावकरांना पाणी देणारे आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील, असा विश्वास कोपरगाव शहरातील महिलांनी व्यक्त केला आहे.

 

Ahmednagarlive24 Office