अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-सरपंचपदाच्या सोडतीमध्ये हिरवेबाजारचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे.
या गावात पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनेलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे विजयी झाले आहेत.
यापैकी तीन महिलांपैकी एका महिलेला सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर पवार यांच्याकडे उपसरपंचपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.
30 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीनंतर पोपटराव पवार हे सरपंच होतील अशी अपेक्षा होती मात्र, त्यांची संधी हुकली आहे. मुख्य म्हणजे या गावातील सरपंचपद सलग चौथ्यांदा राखीव राहिले आहे.
यंदाची निवडणुक बिनविरोध करण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे हिरवे बाजार येथे 30 वर्षांनी निवडणूक घेण्यात आली. विरोधकांनी पॅनल उभा केला. मात्र, त्यांना या निवडणुकीत यश आले नाही.
पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलवर गावकऱ्यांना विश्वास टाकून सर्व उमेदवार विजयी केले. त्यामुळे सरपंचपदाकडे लक्ष लागले होते.
गावकऱ्यांनी विश्वास दाखवून सत्ता दिली असली तरी पोपटराव यांना सरपंचपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांना पूर्वी प्रमाणेच कामकाज करावे लागणार आहे.