अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे २०१९-२० मध्ये देशाच्या कुक्कुटपालन उद्योगास भले मोठे नुकसान सोसावे लागले. मात्र, चालू वित्त वर्ष या ग्रामीण उद्योगासाठी चांगले सिद्ध होऊ शकते.
खर्चात घट आणि चिकनला चांगला भाव मिळाल्याने या व्यवसायात नफा वाढला आहे. रेटिंग संस्था इक्राच्या एका अहवालात हा दावा केला आहे. त्यानुसार, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जवळपास नष्ट होण्यानंतर जूनमध्ये पोल्ट्री उद्योगात पुन्हा उसळी घेतली आहे.
नफा कोरोनाच्या आधीच्या पातळीवर आला आहे. त्यामुळे इक्राने उद्योगाच्या क्रेडिट आऊटलूकला नकारात्मकतेतून स्थिर केले आहे. इक्राचे उपाध्यक्ष आशीष मोदानी म्हणाले, मागणी घटणे आणि चारा महाग होण्याआधी गेल्या वित्त वर्षात बहुतांश कंपन्यांना नुकसान सोसावे लागले होते. काही छोट्या फर्म दिवाळखोर झाल्या होत्या.
मात्र,जून २०२० पासून स्थितीत बदल आला आहे. पोल्ट्री फार्मच्या एकूण खर्चात सुमारे ७०% चाऱ्याचा खर्च होतो. २०% खर्च उर्वरित १०% खर्च औषध, देेखभाल, मजूरी आणि वीजेवर होतो. चाऱ्यातही ६०-६३% हिस्सा मक्याचा होतो. कोरोनात मागणी घटल्याने मक्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com