अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- वीज वितरणच्या पथकाने तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ येथील बर्फ कारखान्यावर धाड टाकून बर्फ कारखान्याची वीज चोरी उघडकीस आणली.
सदर ठिकाणी वीज मीटर बायपास करुन संपूर्ण बर्फ कारखान्याचा लोड रात्रीच्या वेळेस तीज चोरी करत असल्याने त्यांना महावितरण कंपनीतर्फे एकूण ४ लाख ५८ हजार १५० रुपयाचा दंड करण्यात आला.
श्रीरामपूर येथील कार्यकारी अभियंता अजय भंगाळे व उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागातील हरेगाव कक्षाचे कनिष्ठ अभियंता अमोल साठे,
एमआयडीसी कक्षाचे सहायक अभियंता प्रभाकर माळी, श्रीरामपूर शहर कक्षाचे सहायक अभियंता शिवाशीष मिश्रा यांच्या पथकाने तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ येथील किरण वेताळ यांच्या मालकिच्या बर्फ कारखान्यावर धाड टाकून बर्फ कारखान्याची वीज चोरी उघडकीस आणली.
सदर ठिकाणी वीज मीटर बायपास करुन संपूर्ण बर्फ कारखान्याचा लोड रात्रीच्या वेळेस वीज चोरी पकडली. याप्रकरणी अमोल अंकुश साठे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी किरण विठ्ठल वेताळ यांचेविरुद्ध भारतीय विद्युुत अधिनियम २००३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.