Ahilyanagar News: भाजपने नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली व या पहिल्या यादीमध्ये जवळपास राज्यात 99 उमेदवारांचा यामध्ये समावेश करण्यात आला. या जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
परंतु आपल्या ऐवजी आपला मुलगा विक्रम सिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी याकरिता आमदार पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी ताबडतोब मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन मुलगा विक्रम सिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला.
परंतु श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीवरच भाजप पक्षश्रेष्ठी ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता श्रीगोंदा मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते हेच भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते असतील भाजपचे उमेदवार
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत श्रीगोंदे मतदारसंघातून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली.
मात्र, आपल्याऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आ. पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी तातडीने मुंबई गाठत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीभेट घेतली. मात्र, प्रतिभा पाचपुते यांच्याउमेदवारीच भाजप पक्षश्रेष्ठी ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे श्रीगोंदे मतदारसंघात प्रतिभा पाचपुते याच भाजपच्या उमेदवार असतील, हे नक्की झाले आहे.भाजपने पहिल्या यादीत राज्यातील ९९ जागांवरील उमेदवार जाहीर केले.
त्यात श्रीगोंदे-नगर मतदारसंघात प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर शहरातील शनि चौकात पाचपुते समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दरम्यान, मुलगा विक्रमसिंह पाचपुते हे गेल्या काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले असून,
आ. पाचपुते हे आजारी असताना मंत्रालयीन कामांचा पाठपुरावा त्यांनीच केला. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव असल्याने विक्रमसिंह पाचपुते यांनाच विधानसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी आ. पाचपुते व प्रतिभा पाचपुते हे रविवारी तातडीने मुंबईला रवाना झाले.
उपमुख्यमंत्री फडवणवीस यांची त्यांनी सोमवारी सकाळची वेळ घेतली होती. प्रसार माध्यमातूनही याबाबतच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार या प्रतिभा पाचपुते याच असतील, हे निश्चित झाले आहे.