सेंद्रिय उसाच्या रसवंतीला पसंती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : उन्हाच्या तडाख्यात सद्या नेवासा शहर परिसरात लाकडी चरख्याच्या व सेंद्रिय रसवंती गृहाकडे लोकांची अधिक पसंती दिसू लागली आहे. आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने लोक भरउन्हात ताज्या रसाचा आस्वाद घेतांना दिसत आहे.

नेवासा शहराच्या दक्षिणेस खुपटी रस्त्यावर संतोष गायकवाड या शेतकऱ्याने ग्राहकांची गरज ओळखुन सेंद्रिय उसाची रसवंती सुरू केली आहे. या रसवंतीकडे नेवासा शहरातील लोक आकर्षित होत आहे.

मॉर्निंग वॉक करताना जस्थेच्या जस्थे सकाळीच रसाचा आस्वाद घेताना दिसत आहे. दुपारच्या सत्रात रखरखत्या उन्हात लोक येथे भेट देऊन रसाचा आस्वाद घेताना चित्र सद्या दिसत आहे.

सेंद्रिय उसाच्या रसाबरोबर आद्रक, लिंबू, पुदीना, अशी शरीरातील उष्णता क्षमवणाऱ्या आयुर्वेदिक दृष्ट्या आरोग्यास हितावह असणाऱ्या घटक पदार्थांचा यात समावेश असल्याने लोक सेंद्रिय उसाचा रस घेतांना दिसत आहे.

उन्हाळ्यात अनेक रसवंत्या जागोजागी थाटल्या जातात. यामध्ये मशीनयुक्त रसवंत्या अधिक प्रमाणात आहेत. मात्र जुने ते सोने म्हणून लाकडी चरख्याच्या रसवंत्या सद्या लोकांच्या आकर्षण ठरलेल्या दिसत आहे.

नेवासा तालुक्यात ही नगर – छत्रपती संभाजीनगर हायवेवर ही लाकडी चरख्याची रसवंती गृहे दिमाखात थाटलेली दिसत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत असतांना उभारण्यात आलेली रसवंती गृहे ही उन्हाने तप्त व घामाघूम झालेल्या ग्राहकाला तृप करण्याचे काम करताना दिसत आहे.