अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : तयारी आचारसंहितेची ! पहिलवानांसह भाऊ, दादा, काका, भैय्या, साहेबांचे फ्लेक्स उतरविले, महापलिकेकडून कारवाईस सुरवात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. विविध पक्षांचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच लोकसभेसह पडघम वाजला सुरवात होईल. तत्पूर्वीच अवघ्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे.

त्या अनुशंघाने महानगरपालिकेने कार्यवाही सुरु केली आहे. महापालिकेने अहमदनगर शहरात चौकाचौकात राजकीय नेते, कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी, तसेच व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढण्यास सुरवात केली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी प्रभाग एक, दोन व चारमधील ११५ फेक्स, छोटे बोर्ड काढून जप्त केले. यामध्ये सर्वाधिक फ्लेक्स हे राजकीय नेत्यांचे आहेत. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, प्रभाग अधिकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरात जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाने अधिकृत शुल्क आकारून जागा निश्चित केलेल्या आहेत. राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व व्यावसायिक मात्र जागा दिसेल तेथे फ्लेक्स बोर्ड लावतात. यासाठी शहरात लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स महापालिकेच्या पथकाने काढून टाकले.

महापालिकेची कुठलीही परवानगी घेत नाहीत अथवा शुल्क भरत नाहीत. त्यामुळे शहरात प्रत्येक रस्त्यांवर चौकात फ्लेक्सची गर्दी दिसते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

या अनधिकृत फ्लेक्सवर मनपाकडून वांरवार कारवाई होत असली तरी फ्लेक्स लागतच आहेत. त्यामुळे आता मानपाने केवळ फ्लेक्स जप्त न करता ज्यांनी फ्लेक्स लावले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Ahmednagarlive24 Office