आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोग व राज्य मुख्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये
लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत मोबाईल व्हॅनद्वारे ‘ईव्हीएम’चे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर देखील अशा प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये एक अधिकारी, एक कर्मचारी व एक पोलीस नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हयातील १४ तहसिल कार्यालयात ‘ईव्हीएम’ प्रात्यक्षिक केंद्रे उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित राहून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे.
नगर जिल्ह्यातील ३ हजार ७३१ मतदान केंद्रांवर ३७३ यंत्राद्वारे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दिले जाणार असून, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.