बँक निवडणूकीच्या आडून विधानसभेची तयारी सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान तालुक्यातील पक्षीय समीकरणे पुन्हा बदलल्याने जिल्हा बँक निवडणूकीच्या आडून विधानसभा निवडणूकीची गणितेही आखली जावू लागल्याची चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.

जिल्हा बँक निवडणूक ही कारखानदारांसाठी प्रतिष्ठेची राहते. कारण कारखान्यांचे आर्थिक गणित जिल्हा बँकेतील सत्तेच्या चाव्यांवर अवलंबून असते. गेल्यावेळच्या निवडणुकीत दत्तात्रेय पानसरे यांनी बाजी मारली होती.

दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्यात एकमत झाल्याने नागवडे गटाने यांनी निवडणूक लढवावी असे ठरल्याने भोईटे यांना उमेदवारी दिली.

निवडणूकीनंतर स्वीकृत संचालक म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजेंद्र नागवडे यांची वर्णी लावली. आता पुन्हा एकदा बँक निवडणूकीची हालचाल सुरु झाली आहे.

यावेळी राहूल जगताप विरुध्द दत्तात्रय पानसरे अशी सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक होण्याचे निश्चित मानले जाते. महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी बँकेसाठी उमेदवारी करावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

त्यातच शिवाजीराव नागवडे यांच्या त्याच राजकीय वारसदार असतील असे सूचित झाल्याने त्यांना बँकेत जाण्याची गळ घातली जाणार आहे.

दरम्यान, या सगळ्या घडामोडीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतच पुढच्या विधानसभेची बीजे रोवली जाणार आहेत. कारण सध्या ज्या पध्दतीने बँक निवडणूकीची तयारी सुरु आहेत. त्यात पानसरे यांनी विधानसभेची तयारी चालवली असल्याचे बोलले जाते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24