लसीकरणासाठी जय्यत तयारी सुरु; शहरात ड्रायरनमध्ये २५ जणांची नोंदणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरणपूर्व तयारी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेनी केली आहे. शुक्रवारी राबवलेल्या ड्रायरन रंगीत तालमीत २५ जणांची नोंदणी करण्यात आली. लसीकरणानंतर रिअक्शन आल्यास रुग्णवाहिकेसह सुसज्ज तयारी करण्यात आली.

महानगरपालिका कोविड १९ लसीकरणाची ड्रायरन चाचणी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

महानगरपालिकेच्या तोफखाना आरोग्य केंद्रात या डेमोचे नियोजन करण्यात आले होते. त्यात प्रत्यक्ष लस न देता, रंगीत तालीम करून सुसज्ज तयारीचा डेमो घेण्यात आला. यासाठी ५ लसीकरण अधिकारी नेण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी आवश्यक प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष व त्यासोबतच कोविड १९ चे सॅनिटायझर पल्स ऑक्सिमीटर, थर्मा मिटरद्वारे तपासणीचे नियोजन करण्यात आले.

त्यात महानगरपालिकेच्या २५ आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. २५ डमी लाभार्थ्यांचे डमी पद्धतीने लसीकरणाची कार्यवाही करण्यात आली.

या काेरोनाच्या लसीकरणानंतर रिअॅक्शन आल्यास आवश्यक खबरदारी म्हणून सर्व आवश्यक औषधे ठेवण्यात आले, जर लसीकरणानंतर तातडीची आवश्यकता भासल्यास रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24