अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :शुक्रवारी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. कोपरगाव शहरासह तालुक्यात दमदार सारी बरसल्या तर तुलनेत नगर शहरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी काही प्रमाणात कमी झाला असला तरीदेखील शुक्रवारी सायंकाळी शहर व परिसरात काहीसा पावसाचा शिडकावा झाला.
गेल्या पाच दिवसांत जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागात देखील खरिपाच्या मशागतीला वेग आला होता.
गुरुवारी काहीसा पाऊस थांबला होता. शुक्रवारी सायंकाळी मात्र, नगर व परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.
गोदावरीत २२ हजार क्युसेकने पाणी सोडले गोदावरी नदीला यंदा प्रथमत: बावीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. गतवर्षीपेक्षा हे पाणी एक महिनाभर आधीच आल्याने गोदावरी नदी प्रवाहित झाली. मागील वर्षी हे पाणी १० ते १८ जुलैदरम्यान आले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews