अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर अनेकदा वाळू तस्करांकडून जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील.
अशा गुन्हेगारांविषयी नागरिकांच्या मनामध्ये चीड असते. मात्र अशाच एखाद्या आरोपीच्या कार्यक्रमाला पोलीस उपस्थित राहत असतील तर…. तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालणार्या आरोपी सोबत पोलिसाने वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे. गुन्हेगार आणि पोलिस यांच्यातील संबंधावर यामुळे पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
हे संबंध तोडण्याचे आव्हान नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमोर आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर वाळू तस्कराने त्याचे वाहन घातले होते. त्यांच्यासह कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाळवणी येथील वाळू तस्कर अक्षय पाडळे,
आकाश रोहोकले, बापू सोनवणे यांच्या विरोधात स्वत: तहसीलदार देवरे यांनी फिर्याद दिलेली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या विरोधात पारनेर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी यातील आरोपी आकाश रोहोकले याच्या वाढदिवसाला पारनेर पोलिस ठाण्यातील सत्यजित शिंदे व अन्य काही पोलिसांनी हजेरी लावली.
अत्यंत धुमधडाक्यात या वाळू तस्कराचा वाढदिवस साजरा झाला. तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालणार्या या आरोपीच्या विरोधात तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्याद दिलेली आहे. या आरोपीला पकडून त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे सोडून सत्यजित शिंदे या पोलिस कर्मचार्याने आरोपीच्या गळ्यात गळे घातल्याने
पोलिस दलाच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाळू तस्करांच्या विरोधात कारवाईची घोषणा केली आहे. मात्र पोलिसच आरोपींचे साथीदार बनत असेल तर न्याय मागायचा कोणाला? आता या कर्मचार्यासह
त्याला पाठीशी घालणार्या अधिकार्यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात, याकडे पारनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved