अहमदनगर जिल्ह्यातील त्या आठ जणांविरुद्ध मोका कायद्याद्वारे कारवाईचा प्रस्ताव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- भिंगार टोलनाक्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध मोका कायद्याद्वारे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

ज्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक मोका कायद्यानुसार प्रस्ताव दाखल झालेला आहे, त्यात लॉरेन्स स्वामी (भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (निंबोडी), संदीप शिंदे (बुरूडगाव), विक्रम गायकवाड (वाळुंज), बाबा ऊर्फ भाऊसाहेब आढाव (वाळुंज), संदीप वाकचौरे (दरेवाडी), अर्जुन डुबे (दरेवाडी), बाळासाहेब भिंगारदिवे यांचा समावेश आहे.

भिंगार येथील उद्योजक लॉरेन्स स्वामी याचा भिंगार येथील टोलनाका तोडफोड प्रकरणांमध्ये समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी कारवाई करून आठ तासांच्या कारवाईनंतर स्वामी याला अटक केली होती. त्याला सध्या पोलिस कोठडी मिळालेली आहे.

लॉरेन्स स्वामीसह अन्य काही आरोपींचा या टोळीमध्ये समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. या आरोपींविरुद्ध १० ते १२ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24