अहमदनगर बातम्या

नगर – पुणे रोडवर लॉजमध्ये वेश्या व्यवसाय ! पोलिस झाले डमी ग्राहक; मारला छापा आणि नंतर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळते. पोलिसांची दोन वेगवेगळी पथके या लॉजला वेढा मारतात. काही पोलिस डमी ग्राहक बनून लॉजमध्ये जातात. आतील परिस्थितीची पाहणी करतात आणि बाहेर असणाऱ्यांना छापा मारण्याची सूचना करतात.

त्याचबरोबर लॉजच्या बाहेर असलेले पोलिस लॉजवर छापा मारतात आणि पीडित महिलांची सुटका करतात. ही सिनेस्टाइल कारवाई आहे नगर पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथील. बुधवारी (दि. २७) सायंकाळी बेलवंडी पोलिसांनी दोन लॉजवर छापा मारीत सहा महिलांची सुटका केली व दोन आरोपींना अटक केली.

नगर – पुणे रोडवर गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) येथे सोनल गार्डन लॉज व अमृत लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती.

या लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाबाबत त्यांनी कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना माहिती देऊन कारवाईसाठी दोन स्वतंत्र पथकांची निर्मिती केली.

शासकीय पंच बोलावले आणि सोनल लॉज व अमृत लॉज येथे छापा मारला. प्रारंभी त्यांनी दोन्ही लॉजला वेढा मारला. पोलिसांना डमी ग्राहक बनवून आत पाठवले. वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्यानंतर ठेंगे यांच्यासह पोलिसांचे पथक आत गेले आणि सहा महिलांची सुटका केली.

या कारवाईत पोलिसांनी सोनल लॉजचा मॅनेजर बालाजी चंदन नरहरी (रा. चादुरेवाडी, हल्ली रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) अमृत लॉजचा मॅनेजर रामलखन भैय्यालाल वर्मा (रा. वॉर्ड नं. १३, मेमरी खुर्द, पो. रघुराजगढ, ता. मनगवा, जि. गवा, राज्य – मध्य प्रदेश, हल्ली रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) या दोघांना अटक केली.

दोन्ही लॉजवर होत्या तीन तीन महिला

सोनल गार्डन लॉज व अमृत लॉज येथे प्रत्येकी तीन महिलांच्या साह्याने वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी एकूण सहा पीडित महिलांची सुटका करून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ४ व ५ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

या कारवाईत दोन्ही लॉजच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी लॉज मालकांवर मेहेरनजर दाखवली. लॉजवर महिलांना घेऊन आलेल्या तीन चार गुलछबूंनी पोलिसांपुढे गयावया केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे समजते. त्याच्यावर कारवाई करण्यात कानाडोळा केल्याची चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office