Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.लाडगाव येथे पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे.
याला गावातील महिलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरक्षणाचे आंदोलन असेच पुढे नेण्यासाठी काल मंगळवारी गावातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी येथील पाण्याच्या टाकीवर चढून घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात बाबासाहेब भांड, गणेश भांड, धनंजय चौधरी यांनी भाग घेतला. सकाळी गावातील उंच पाण्याच्या टाकीवर जाऊन घोषणाबाजी करत आंदोलन केले. याप्रसंगी सरपंच, ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस कर्मचारी संदीप पवार यांनी समजूत काढत आंदोलकांना खाली घेतले.
याप्रसंगी बाबासाहेब भांड म्हणाले, आम्ही अजून समजुतीचीच भुमिका घेत आहोत; परंतु सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा सरकारला हे आंदोलन झेपणार नाही आणि पेलणारपण नाही. सरकारने मराठा आरक्षण आंदोलन हलक्यात घेऊ नये, असा इशारा भांड यांनी दिला.