अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- शेवगाव तालुक्यातील दहा पंधरा वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी तालुक्याला 125 कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी येथे दिली.
सामनगाव, वडुले व मळेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आज (दि.16) जिल्हा परीषद अध्यक्षा घुले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी घुले म्हणाल्या की, तळागाळातील आपल्या माणसांसाठी काम करा ही स्व.घुले यांची शिकवण जिल्हा परीषदेत काम करताना पाळली असून प्रलंबीत कामे मार्गी लावताना पक्षीय भेद बाजूला ठेवल्याने काम करणे अधिक सोपे झाले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, पंचायत समिती सदस्या मनीषा कोळगे, बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, अशोक नजन, सुधाकर लांडे,
ढोरजळगावच्या सरपंच रागिनी लांडे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तारअधिकारी शैलेजा राऊळ, केंद्र प्रमुख नवनाथ फाटके आदी प्रमुख उपस्थित होते.