भजन पडले महागात; आणखी दहा जणांना कोरोनाची बाधा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र जिल्ह्यातील अकोळनेर मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी केली असता काही जण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

तसेच काही जणांचे अहवाल प्रलंबित होते, त्यातील आहि अहवाल प्राप्त झाले आहे. या तपासणीत आणखी 10 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. दोन दिवसांत गावात करोनाचे तब्बल 48 रूग्ण सापडले आहेत.

त्यामुळे आता गावात चौदा दिवसांचा बंद ठेवण्यात येणार आहे. तहसिलदार उमेश पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती मांडगे

यांनी रविवारी दिवसभर गावात थांबून तपासणी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. कार्यक्रमाला झालेल्या गर्दीमुळे कोरोना वेगाने फैलावला असून ऐन दिवाळीत गाव बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24