अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार आमदार पवार यांना नाही. आपण स्वत: काही तरी काम मंजूर करून आणावे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ
नये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी म्हटले अाहे.
काशिद यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी यांनी मंजूर केलेल्या व त्यांनीच भुमिपूजन केलेल्या रस्त्याच्या कामाचे पुन्हा भुमिपूजन आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (२४ जुलै) केले.
माजी पालकमंत्री शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील हाळगाव ते आघी रस्ता डांबरीकरण करणे साठी दोन कोटी ४४ लाख ६९ हजार इतका निधी मंजूर केला
या कामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी आघी येथे केले होते. तसेच हाळगाव ते ढवळे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे साठी १ कोटी ८७ लाख रुपये निधी मंजूर केला आणि भुमिपूजनही केले,
असे असताना आमदार पवार यांनी २४ जुलै रोजी या रस्त्याचे कामाचे पुन्हा भूमिपूजन केले. दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार आमदार पवार यांना नाही, त्यामुळे भाजपच्या वतीने त्यांचा निषेध, असे या पत्रकात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com