अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- अहमदनगर सिटी टाइम्सच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. लेख, कविता या साहित्याची मेजवानी असलेला साप्ताहिक अहमदनगर सिटी टाइम्सचा दिवाळी अंक यंदा पृष्टसंख्येने कमी आहे,
पण या अंकात पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वास्तूंची महती दर्शविणारे लेख वाचनीय तर आहेत, पण संग्रही असावे, असे आहेत. इसवी सनापूर्वीपासून भिंगाराचं अस्तित्व असून
या मागचा आजपर्यंतचा इतिहास नमूद करणारा सुधीर कुलट यांचा लेख तर बाराव्या शतकात नगर जिल्ह्यात चक्रधर स्वामींचा आणि त्यांचा महानुभाव पंथाची महती मोडीलिपी वाचक आणि लेखक नारायण आव्हाड यांचा लेख आणि ‘वास्तू संवर्धन : काळाची गरज’ हा सदानंद भणगे यांचा लेख यात आहे.
‘मुलांचा बुद्धी विकास व त्यासाठी विविध उपक्रम हा प्रा.वसंत जोशी यांनी लेखातून सांगितला आहे. ‘लाल’चं महत्व असा वेगळा विषयाचा लेख बाळकृष्ण कुलकर्णी यांचा आहे.
आध्यात्मिक आणि वार्षिक राशी भविष्य चिंतामणी देशपांडे तर पुंडलिक गवंडी, बिभिषण यादव आणि सौ.सुरेखा घोलप-भुकन यांच्या कविता यात आहेत.
‘गोष्ट छोटी सूख मोठे’ हा चिंतनाचा विषय संपादकीय लेखात मांडला आहे. कु.प्रतिभा सांगळे यांच्या सुरेख छायाचित्राने मुखपृष्ठ सजले आहे.
या अंकाचं संपादन संपादक राजेश सटाणकर यांनी तर सौ.सुस्मिता अय्यंगार यांनी संपादन सहाय्य केले आहे तर जयंत देशपांडे व रुपेश हिवाळे यांनी उत्कृष्ट मांडणी केली आहे.
सुजय भंडारे आणि टीमने छपाई, बांधणी करुन अंक सजवला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘सिटी टाइम्स’ने स्वतंत्र ठसा उमवत 34 व्या वर्षात पदार्पण करत अंक तिसर्या तपाकडे वाटचाल करीत आहे. पृष्टसंख्या 20 असून किंमत – 15 रुपये आहे.