अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-ग्राहक पंचायत अकोले शाखेच्या वतीने ग्राहकांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक केली जाते हि बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार तहसिलदार मुकेश कांबळे यांनी काढले.
तर ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी वगळता इतर कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याबाबत ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अकोले तहसिल प्रशासन व अकोले तालुका ग्राहक पंचायत, महाराष्ट्र, शाखा अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसिलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या माहिती व कार्यदिशा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ग्राहक दिन कार्यक्रमास नायब तहसिलदार महाले, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेणकर, अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले,
दत्ता रत्नपारखी, राम रूद्रे, कैलास तळेकर, दत्ता कोल्हाळ, भाऊसाहेब वाकचौरे, प्रा.डॉ.सुनिल शिंदे, सुदिन माने, भाऊसाहेब गोर्डे, दत्तात्रय ताजणे, रामहरी तिकांडे, अॅड. राम भांगरे,
दिलीप शेणकर, राजेंद्र घायवट, अॅड. दीपक शेटे भाऊसाहेब वाळुंज, दत्ता घोडके, राधाकिसन कुमकर आदी मान्यवर उपस्थित होते. तहसिलदार कांबळे म्हणाले की चालु वर्षात कोरोना व प्रशासकीय कामामुळे वेळ कमी मिळाला.
मात्र आचारसंहिता संपल्यानंतर सर्व विभागाच्या प्रमुख अधिकार्यांची बैठक घेऊन व्यापक स्वरूपात ग्राहक दिन घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाईल.
तर गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी पंचायत समितीच्या ज्या काही तक्रारी असतील, त्या आपण माझेकडे द्याव्यात, त्यांची देखील निश्चित सोडवणुक केली जाईल.
ग्राहक दिनात तहसिलदारांना शेतकर्यांच्या वतीने पीक विमा, आणेवारी, फेरफार, रेशनिंग, रस्ते, आरोग्य, गॅस, वीज, पतसंस्था, धान्य दुकाने इ. बाबत लेखी व तोंडी तक्रारी सांगण्यात आल्या.
तर ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी वगळता इतर कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याबाबत ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, प्रा.डॉ. सुनिल शिंदे, अॅड. राम भांगरे यांची मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश नवले यांनी केले. तर सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.