राहुल ठाणगे लिखित ‘हृदयसंवाद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर: कवी हा समाजाचा एक भाग आहे त्याने निरीक्षणातून समाजाच्या व्यथा जगासमोर मांडाव्यात असं मत दिग्दर्शक शशिकांत नजान यांनी व्यक्त केलं. नवोदित कवी राहुल ठाणगे लिखित हृदयसंवाद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळयात ते बोलत होते. प्रेमकविता लिहिणारा कवी काय आणि सामाजिक कविता लिहिणारा कवी काय तो आपल्या काव्यातून व्यक्त होत असतो .

मुक्या भावनांना शब्दांतून वाट करून देणे गरजेचे आहे जे राहुलने केले.याबाबत नजान यांनी काव्यसंग्रहाचे भरभरून कौतुक केले.. सिने अभिनेते क्षितिज झावरे यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे माऊली सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी झावरे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित सर्वांना खळखळून हसवले.

प्रेमाला वयाचे, जातीचे बंधन नसते. प्रेम ही व्यापक भावना असून माणूस जिवंत असण्याचे प्रेम हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेमाने माणूस समृद्ध होतो, आणि जाणीव ,संवेदना या जागृत राहतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ऑरेंज इव्हेंटचे संचालक सागर मेहेत्रे यांनी आपली स्वरचित कविता सादर करून प्रकाशन सोहळ्यात रंग भरले..

नगर पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांनी राहुल ठाणगे यांचे कौतुक करतानाच ग्रामीण भागातील युवक लिहिता होतोय याचं कौतुक वाटते अशी भावना व्यक्त करतानाच राहुलला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हृदयसंवाद या पुस्तकाला सुप्रसिद्ध युवा लेखक ,पत्रकार नवनाथ सकुंडे यांची प्रस्तावना लाभली आहे.

यावेळी संकेत पिसे पाटील, जालिंदर शिंदे, अशोक अकोलकर, संतोष शिंदे, सुहास रायकर, प्रसाद साबळे पाटील, महादेव गवळी, ऍड. सचिन चंदनशिव, नितेश बनसोडे, डॉ.बाळासाहेब शिंदे ,प्रा. मच्छीन्द्र म्हस्के, किरण बारस्कर , सचिन हुलावळे , खंडेलवाल महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार कवी राहुल ठाणगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण अनभुले, हर्षवर्धन साळवे, प्रथमेश दुस्सा, संतोष वाघ ,गणेश शिंदे सरकार, सुशील शेळके,महेश काळे, राम बोराटे, नितीन चोथे, निलेश काळे, वैभव ठुबे, मयूर पाटील, माऊली शिंदे यांनी परिश्रम घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24